‘माझी हात जोडून विनंती, आता कोणाला फसायचं नाही’, बार्शीच्या आमदारानं जरांगे पाटलांना जोडले हात

| Updated on: Sep 12, 2024 | 2:58 PM

गेल्या वर्षभरापासून समाजाच्या बाबतीत सुरू असलेले राजकारण थांबवा आणि नौटंकी करू नका असे म्हणत नाव न घेता राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Follow us on

विशेष अधिवेशनासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे. प्रत्येक आमदाराने आपापली भूमिका जाहीर करावी, असं राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे. दरम्यान, राजेंद्र राऊत यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजेंद्र राऊत यांना मराठा आरक्षण नाही तर पक्ष महत्त्वाचा आहे. मराठा असूनही मराठा आरक्षणाच्या विरोधात जाऊन केवळ पक्षासाठी ठिय्या आंदोलन करत आहेत.’, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत राजेंद्र राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिनाचे औचित्य साधून सुरु करत आहे. त्यामुळे 16 सप्टेंबरच्या रात्री पासून जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांना हात जोडून विनंती केली आहे.