‘काँग्रेसची नौटंकी’, संभाजी भिडे यांच्या विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनावर रवी राणा यांची टीका

| Updated on: Jul 30, 2023 | 2:04 PM

VIDEO | '...तेव्हा काँग्रेसवाले झोपले होते का?', हनुमान चालीसा पठणवरून रवी राणा यांनी काँग्रेसला सुनावले

अमरावती, 30 जुलै 2023 | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच पेटलंय. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. या वक्तव्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे. यावर आमदार रवी राणा यांनी काँग्रेसवर टीका करत माविआ सरकारने नवनीत राणा आणि मला हनुमान चालीसा पठण केलं तेव्हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत जेल मध्ये टाकलं होतं. तेव्हा काँग्रेसवाले झोपले होते का? असा सवाल उपस्थित केला तर काँग्रेसने कायदा हातात घेऊन आंदोलन करून राजकीय नौटंकी करू नये, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.

Published on: Jul 30, 2023 02:00 PM
रविवारचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटवर पर्यटकांची तुफान गर्दी
‘आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडे यांच्यासोबत जाणे हे…’, भुजबळ यांचा थेट भाजपला अप्रत्यक्ष सल्ला