निकालाच्या दिवशी तिसऱ्या बायपास सर्जरीची वेळ… संजय राऊतांना कोणाचा खोचक सल्ला?

| Updated on: Jun 03, 2024 | 3:05 PM

तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे बहुमताने आणि मोठ्या ताकदीने पंतप्रधान बनणार आहेत. केंद्रात मोदी तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा विश्वास रवी राणांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राणा म्हणाले... उद्या संजय राऊत यांना तिसरी बायपास सर्जरी करण्याची गरज नाही पडली पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला कोणता दुसरा पर्याय नाही. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे बहुमताने आणि मोठ्या ताकदीने पंतप्रधान बनणार आहेत. केंद्रात मोदी तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा विश्वास रवी राणांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राणा म्हणाले, ‘जेव्हा ठाकरे मोदींनी शपथ घेतल्यानतंर त्यांच्यासोबत जातील तेव्हा राऊत आपलं तोंड गप्प करतील. चार-पाच दिवस बकबक करतील. त्यांची बायपास सर्जरी झाली आहे. त्यामुळे उद्या निकालाच्या दिवशी त्यांनी २-३ डॉक्टर सोबत ठेवावे. बीपीच्या गोळ्या सोबत ठेवाव्यात कारण उद्या तिसरी बायपास सर्जरी करण्याची गरज नाही पडली पाहिजे’, असा खोचक सल्लाही राणींनी दिला.तर बाळासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन, त्याच विचाराप्रमाणे नरेंद्र मोदी देशात सध्या काम करत आहेत. बाळासाहेबांनी नेहमी मोदींचे कौतुक केले इतकंच नाहीतर हिंदुत्वाला पुढे नेण्याचं काम मोदी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. यासंदर्भात मोदींनी सांगितलं होतं की बाळासाहेबांसोबत संबंध आहेत. तर आमच्यात असणाऱ्या आपुलकीच्या नात्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक खिडकी नेहमी उघडी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ते मोदी यांच्या सोबत जातील आणि त्यांना पाठिंबा देतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jun 03, 2024 03:05 PM