Ravindra Dhangekar यांचं मोठं वक्तव्य, जर पक्षाने मला विचारलं तर…

| Updated on: Oct 10, 2023 | 2:03 PM

VIDEO | पुण्यातील कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून जर मोहन जोशी यांना उमेदवारी दिली तर त्यांचा विजय निश्चित आहे, असे धंगेकर म्हणाले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.

पुणे, १० ऑक्टोबर २०२३ | पुणे लोकसभा मतदारसंघातून जर मोहन जोशी यांना उमेदवारी दिली तर त्यांचा विजय निश्चित आहे, असं मोठं वक्तव्य काँग्रेस आमदारानं केलं आहे. पक्षाने जर मला विचारलं तर मी पुणे लोकसभेसाठी मोहन जोशी यांचे नाव सांगणार असल्याचे पुण्यातील कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. मोहन जोशी यांचे इतक्या वर्षांपासून पुण्यात काम आहे, त्यांचं नाव पुणे लोकसभेसाठी चर्चेत आहे, मोहन जोशी यांना उमेदवारी दिली तर उत्तम आहे. मात्र हा सर्व पक्षांचा निर्णय आहे. असेही रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. कारण मी साधा एक कार्यकर्ता आहे. मी काही नेता नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांनाच मान्य असेल असेही रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारासंदर्भात भाष्य करताना म्हटले आहे.

Published on: Oct 10, 2023 02:03 PM
Eknath Shinde गटाची माघार? ठाकरे गटाचा दसरा मेळावा ‘शिवतीर्थ’वरच होणार
Nitesh Rane यांचा ‘या’ नेत्याबद्दल मोठा दावा, शरीराने केवळ ठाकरेंसोबत मात्र मनाने शिंदेंसोबत