राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले, ‘कुटुंबात दोन पाडवे होतायत हे…’

| Updated on: Nov 02, 2024 | 5:51 PM

आतापर्यंत बारामतीत पवार कुटुंबीयांचा एकच दिवाळी पाडवा व्हायचा मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आणि अजित पवार यांच्या बंडामुळे नात्यांमध्ये दुरावा आल्याने पाडवे देखील दोन झाल्याचे यंदा बघायला मिळाले.

बारामतीमध्ये शरद पवारांचा तर काटेवाडीमध्ये अजित पवार यांचा पाडवा होत आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी दिवाळी पाडव्याची प्रथा सुरू केली होती आणि त्यामध्ये अजित पवार सहभागी व्हायला लागले होते, असं रोहित पवार म्हणालेत. तर बारामतीतील काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा होतोय, हा अजित पवाारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही रोहित पवार म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शऱद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गोविंदबागेत यायचे. त्यानंतर अजित पवार सहभागी झाले. मग सुप्रिया सुळे सहभागी झाल्यात नंतर मी आलो त्यानंतर ही दिवाळी पाडव्याची परंपरा सुरू झाली आणि आजही आहे. शरद पवार जिथे उभे राहतात तिथे लोकं त्यांना भेटतात. आता अजित दादांनी वेगळा निर्णय घेतला तर मला त्यावर काही बोलता येणार नसल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. पण पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडवे होतायत  हे दुःखदायक आहे, असं रोहित पवार म्हणाले.

Published on: Nov 02, 2024 05:51 PM
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या होणार उमेदवारांची घोषणा, मनोज जरांगे म्हणाले…
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा