अदानी ग्रुपकडून आपला स्वत: चा फायदा कसा करून घ्यायचा हे रोहित पवारांनी सांगितलं, पाहा…
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात बोलताना अदानी ग्रुपवर भाष्य केलंय. पाहा ते काय म्हणाले...
सोलापूर : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात बोलताना अदानी ग्रुपवर भाष्य केलंय. हिडेनबर्गसारख्या कंपनीने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी असे उद्योग सुरू केले आहेत. अदानीसारख्या कंपनीचे शेअर्स पडले की ते खरेदी करायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा, असं रोहित पवार म्हणाले. मिसगाईड करणे हेडनबर्गचे काम आहे. देशात रोजगार देण्यामध्ये अदानी हे चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे युवक वर्ग तसेच गुंतवणूकदार डिस्टर्ब होतात. त्यामुळे अदानींनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीतून काढले नाही पाहिजे, असंही रोहित म्हणाले.
Published on: Feb 06, 2023 03:59 PM