बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानंतर सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढणार

| Updated on: Jan 12, 2023 | 8:14 AM

ती गोळी आमदार सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच सुटल्याची बाब समोर आली आहे. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत.

मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर दादर पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात ‘त्या’ गोळीसंदर्भातील अहवाल आला आहे. ती गोळी आमदार सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच सुटल्याची बाब समोर आली आहे. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. या राड्या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात १५ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. यामध्ये पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दीदरम्यान सदा सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे खळबळ उडाली.

Published on: Jan 12, 2023 08:11 AM
सध्या महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण; संदीप क्षीरसागर यांची भाजपवर टीका
KOLHAPUR NEWS : आधी NO ENTRY, आता ENTRY, हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्याचा काय आहे किरीट सोमया यांचा ‘प्लॅन’?