संजय राऊत यांना प्रत्येकवेळी पैसे मोजायला ठेवत असतील, शिंदे गटातील ‘या’ आमदारानं दिलं जशाचं तसं उत्तर
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या 'त्या' टीकेवर शिंदे गटातील आमदारानं प्रत्युत्तर देत घेतला समाचार
मुंबई : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी संजय राऊतांना जशाच तसं चोख प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना सदा सरवणकर म्हणाले, आमदारांना पैसे दिले असे म्हणता ना, संजय राऊत यांना प्रत्येकवेळी पैसे मोजायला ठेवत असतील. आता ही संजय राऊत म्हणाले धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी २००० कोटी रूपये दिले. एक दुर्दैवी घटना म्हणजे संजय राऊत यांना कळतंय की, महाराष्ट्रात आपण जे बोलतोय त्याचं हसं होतंय. हुशार म्हणून या व्यक्तीकडे आम्ही बघत होतो, मात्र आता कळतंय त्यांची हुशारी कशात आहे, असे म्हणत सदा सरवणकर यांनी संजय राऊत यांना खोचक टोला देखील लगावला आहे.
Published on: Feb 20, 2023 04:48 PM