राज ठाकरेंच्या हाती शिवसेनेची कमान? राज ठाकरेंच्या नेतृत्वाला शिंदे गटातून जोरदार विरोध, शहाजीबापू म्हणाले…

| Updated on: Mar 25, 2024 | 4:48 PM

भाजप नेते अमित शाह यांची राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध होत आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला जोरदार विरोध केलाय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची कमान देणार असल्याच्या चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धुरा राज ठाकरेंकडे देण्याच्या हालचाली सुरू आहे. भाजप नेते अमित शाह यांची राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध होत आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला जोरदार विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेत. त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. असं काही असेल तर साहेबांना भेटून आम्ही स्पष्ट नकार देऊ, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वाला विरोध दर्शवला आहे. यावेळी त्यांनी माढावरही भाष्य केले. माढ्यातून महाविकास आघाडीने शेकापचे अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली तर ही लढत अशोभनीय असेल. त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे तीन लाख मताधिक्याने निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.

Published on: Mar 25, 2024 04:48 PM
बीडचं पार्सल बीडला परत पाठवा, भाजपचा हा उमेदवार सोशल मीडियावर जोरदार ट्रोल
लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार फिक्स? फक्त घोषणा बाकी, कुणाची नावं निश्चित?