शिवेंद्रराजे भोसले यांचं कुणाला चॅलेंज? म्हणाले, ‘शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर…’

| Updated on: Oct 01, 2023 | 4:28 PM

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं भाष्य, 'विरोधकांनी वाघ नखाबाबत केलेला प्रश्न यामध्ये राजकारण आहे. विरोधक म्हणतायेत ही वाघ नखे खरी आहेत का? शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर ते सिद्ध करा'

सातारा, १ ऑक्टोबर २०२३ | शिवरायांची वाघनखं लंडनहून परत आणण्याच्या हालचालींना वेग आलाय. शिवरायांनी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी भारतात परत आणण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातील एक महत्त्वाचा घटक समजला जाणारी वाघ नखे याविषयी होत असलेल्या आरोप प्रत्यारोपावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी वाघ नखाबाबत केलेला प्रश्न यामध्ये राजकारण आहे. सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून जी वाघ नखे लंडनमध्ये होती ती भारतात येत आहेत. विरोधक म्हणतायेत ही वाघ नखे खरी आहेत का? तर माझा त्यांना उलट सवाल आहे ती खोटी आहेत का? शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर ते सिद्ध करा, असे म्हणत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. तर अशा पद्धतीने ज्या गोष्टीं सोबत मराठी माणसाची अस्मिता जोडली गेलेली आहे, त्याचं राजकारण करू नका, असा सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला आहे.

Published on: Oct 01, 2023 04:28 PM
‘एकनाथ शिंदे हे वाघ’, असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
शिवरायांच्या वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार स्पष्टच म्हणाले…