‘भाजप नेत्यांवर विश्वास नसल्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्र्याना भेटले’, कुणी लगावला खोचक टोला

| Updated on: Aug 16, 2023 | 8:41 PM

VIDEO | भाजपच्या मंत्र्यांचा भाजपच्याच मंत्र्यांवर विश्वास नसल्यास विरोधक आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? वैभव नाईक यांचा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सवाल

सिंधुदुर्ग, १६ ऑगस्ट २०२३ | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीवर आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर विश्वास नसल्यामुळे आणि आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठीच राणे यांनी मुंबई महार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असा उपरोधक टोला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना लागवला आहे. त्यासोबतच भाजपच्या मंत्र्यांचा भाजपच्याच मंत्र्यांवर विश्वास नसल्यास विरोधक आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? असा सवालही नारायण राणे यांना वैभव नाईक यांनी केला आहे. तर याबाबत नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Published on: Aug 16, 2023 08:41 PM
भूमिपूजन फलकावरून वाद शिगेला, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना कुठे भिडले?
‘राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढवावी’, कुणी लगावला खोचक टोला