लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल

| Updated on: May 08, 2024 | 4:18 PM

लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार आहे. राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.

लोकसभा निवडणुकीच्या लगोलग आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार आहे. राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे. या चार जागांसाठी १० जूनला मतदार होणार आहे. तर १३ जूनला मतमोजणी होणार आहे.

Published on: May 08, 2024 04:15 PM
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीख अन् कारण सांगितलं
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न…, शरद पवारांच्या मुलाखतीवर संजय शिरसाटांचं सूचक वक्तव्य