लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली ‘ही’ निवडणूक पुढे ढकलली
विविध शिक्षक संघटनांनी मुंबई आणि नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. अशातच निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक येत्या 10 जून रोजी होणार होती पण आता ती लांबणीवर गेली आहे.
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक येत्या 10 जून रोजी होणार होती पण आता ती लांबणीवर गेली आहे. विविध शिक्षक संघटनांनी मुंबई आणि नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. अखेर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 10 जूनला अनेक शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा शिक्षक संघटनांनी म्हटले होते. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली असून विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.
Published on: May 14, 2024 04:55 PM