Ladki Bahin Yojana : महिलांनो… ‘लाडकी बहीण’चा फॉर्म मराठीत भरलाय? 1500 रुपये मिळणार नाही? नव्या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक
छानणी सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषा नसल्याने मराठीतील अर्ज बाद होण्याची मनसे कार्यकर्त्यांना शंका आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मराठीतून भरलेले लाभार्थींचे अर्ज रद्द करण्यात यावे, अशा लेखी सूचना प्रशासनाने दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
राज्य शासनाची महत्त्वकांक्षी असलेली लाडकी बहीण योजना शासनाच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा वादात सापडली आहे. मराठीतील अर्ज बाद करण्याच्या शासन निर्णयाला मनसेने विरोध दर्शविला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेचं काम पाहणाऱ्या एजन्सीमुळे बुलढाण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. छानणी सॉफ्टवेअरमध्ये इंग्रजी भाषा असल्याने मनसे आक्रमक झाला असून मनसेने काळया फिती लावून निषेध नोंदविला आहे. छानणी सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषा नसल्याने मराठीतील अर्ज बाद होण्याची मनसे कार्यकर्त्यांना शंका आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मराठीतून भरलेले लाभार्थींचे अर्ज रद्द करण्यात यावे, अशा लेखी सूचना प्रशासनाने दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. लाखो महिला भगिनींनी मराठीतून अर्ज भरलेले आहेत, आता हे अर्ज बाद होण्याच्या भीतीने आणि मराठी भाषेचा अपमान होत असल्याच्या भावनेने, मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ्याफिती लावून शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे तर यासंनदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ही दिले आहे.