Pune MNS Protest | कोणत्या मागणीसाठी स्विमिंग पुलवर क्रिकेट खेळत मनसेनं केलं हटके आंदोलन

| Updated on: May 17, 2023 | 4:23 PM

VIDEO | पुण्यातील औंध येथील जलतरण तलाव मनसेच हटके आंदोलन, क्रिकेट खेळत कोणती केली मागणी?

पुणे : पुण्यातील औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड येथील जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी मनसेने अनोखं आंदोलन केलं. आपली मागणी मान्य करावी म्हणून स्विमिंग सूट, गॉगल, ट्यूब ,परिधान करून तलावात क्रिकेट खेळून मनसेच हटके आंदोलनं आज पाहायला मिळालं. 2017 पासून बंद असलेला जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करावा, अन्यथा मनसे स्टाईलनं पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसैनिकांनी दिला. पुणे महापालिकेला या जलतरण तलावाबाबतील अनेक तक्रारी दिल्या मात्र तरीही महापालिकेकडून याप्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे मनसैनिकांसह इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. येत्या १५ दिवसांत हा जलतरण सुरू झाला नाही तर मनसे खळखट्ट्याक स्टाईलनं पुढचं पाऊल उचलेल असा इशाराही पुन्हा मनसैनिकांकडून देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: May 17, 2023 04:23 PM
महाविकास आघाडी टिकणार का? नाना पटोले स्पष्टच बोलले…
सुजय विखे पाटील यांचा रोहित पवार यांना पाठिंबा? राम शिंदे यांच्या ‘त्या’ आरोपांवर काय म्हणाले…