… तर मनसे स्टाईल आंदोलन करणार, पुण्यातील ‘त्या’ अनधिकृत मशिदीबाबत पुन्हा इशारा

| Updated on: Mar 23, 2023 | 10:01 PM

VIDEO | पुण्यातील मनसे नेते अजय शिंदे यांचा राज्य सरकारला दिला इशारा, काय म्हणाले बघा...

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, पुण्यात पुन्हा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात अनधिकृत मशिदीचे बांधकाम केलं जातंय असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेकडून यासंदर्भात शुक्रवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह पुरावे मांडण्यात येणार आहे. राज्य सरकारने या ठिकाणी उत्खनन करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. राज्य सरकारने लवकर कार्यवाही केली नाही तर मनसे स्टाईलन आंदोलन करणार असल्याचे मनसेचे नेते अजय शिंदे यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 23, 2023 10:00 PM
ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर…
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अपडेट, कोर्टानं काय दिला निर्णय?