पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; अमित ठाकरे यांच्या नेतृत्वातील मोर्च्याच्या मागण्या काय?
पुण्यातील चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये मोठ्या संख्येने मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा होता.
पुणे, २३ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा निघाला. हा मोर्चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. यावेळी अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे या सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये मोठ्या संख्येने मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा होता. मोर्चा विद्यापीठाच्या गेटवर धडकल्यानंतर आडवण्यात आला. मराठी भाषा भवन निर्माण करावे आणि वसतीगृहाच्या दर्जा सुधारण्याची मागणी मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुंना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडाळाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते.