औरंगाबादच्या चौका-चौकात मनसे, शिवसेनेचे बॅनर लावत चढाओढ
आज औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे.
आज औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या आहेत. त्यापैकी एक मुंबईत गुढीपाडव्याच्या दिवशी झाली होती. तर दुसरी ठाण्यात सभा झाली. या दोनही सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवरील भोंग हटवण्यासाठी सरकारला तीन मे रोजीचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे. आता राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेत बॅनर लावत चढाओढ सुरू झाली आहे. औरंगाबादच्या चौकाचौकात हे बॅनर पहायला मिळत आहेत.