आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे का? राज ठाकरे यांचा सरकारलाच थेट सवाल

| Updated on: Feb 20, 2024 | 4:04 PM

विधानसभेत एकमताने मंजूर झालेल्या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. दरम्यान, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही काय दिलं?

Follow us on

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. दरम्यान, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही काय दिलं? कशात 10 टक्के आरक्षण दिलं? तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारलाच केला. पुढे ते असेही म्हणाले की, तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? नाहीतर परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार. मग राज्य सरकार सांगणार प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय. आम्ही काही करु शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहेत का? असा सवालही राज ठाकरे यांनी थेट सरकारला केला. तर आरक्षण देणं हा खूप तांत्रिक विषय आहे. सरकारने जाहीर केलं म्हणजे त्याचा आनंद व्यक्त करण्यासारखं नाही. 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे नक्की काय आहे? हे एकदा मराठा समाजाने सरकारला विचारावं, असेही राज ठाकरे यांनी मराठा समाजाला सांगितले.