Raj Thackeray | वाढदिवशी ‘कृष्णकुंज’वर येऊ नका, घरीच राहा, राज ठाकरेंचं पत्राद्वारे मनसैनिकांना आवाहन
कोरोनाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं केलं आहे. | MNS Chief Raj thackeray not Celebrate his birthday
सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे. राज्यात कालच एका दिवसात 12,207 रुग्ण सापडले आहेत. तर दीड लाखाहून अधिक रुग्ण उपचार घेत आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं आहे. त्यांनी हे पत्रक ट्विटरही टाकलं आहे. येत्या 14 जून रोजी राज यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवशी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये म्हणून राज यांनी हे आवाहन केलं आहे. हे आवाहन करताना त्यांनी मनसे सैनिकांना राज्यातील कोरोना परिस्थिती आणि कोरोनामुळे होणाऱ्या धोक्याची सूचना देऊन काळजी घेण्याचं कळकळीचं आवाहनही केलं आहे.
Published on: Jun 11, 2021 12:54 PM