‘लाव रे तो व्हिडीओ’ रिटर्न… राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंच्या टीकेवरून ठाकरेंना सवाल तर ठाकरे गटाचा पलटवार काय?

| Updated on: May 14, 2024 | 11:22 AM

पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरेंनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ भर सभेत दाखवत उद्धव ठाकरे यांना सवाल केला. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षात घेऊन प्रवक्ता कसं केलं? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओ म्हणत सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ भर सभेत दाखवत उद्धव ठाकरे यांना सवाल केला. तर विरोधकांनी राज ठाकरे यांच्या जुन्या भूमिकेचे व्हिडीओ दाखवून त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. २०१९ च्या लाव रे तो व्हिडीओवरून राज ठाकरे देशभर चर्चेत राहिले, त्याच स्टाईलने राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा व्हिडीओ सभेत दाखवला. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षात घेऊन प्रवक्ता कसं केलं? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला. तर ज्या राणे कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल विधानं केली. तुम्ही त्यांच्याच प्रचाराला कसं गेलात? असा प्रतिप्रश्नच ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना करण्यात आला. बघा स्पेशल रिपोर्ट राज ठाकरे यांनी काय केली टीका अन् विरोधकांकडून काय मिळालं प्रत्युत्तर?

Published on: May 14, 2024 11:22 AM
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद? शरद पवार गटाचा आरोप