शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेआधी मनसेचे बडे नेते काय म्हणताय?

| Updated on: Apr 09, 2024 | 7:45 PM

लोकसभा निवडणुकीची राज्यात धामधूम पाहायला मिळत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. यामध्ये मनसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का? मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसे बाहेर राहून महायुतीला पाठिंबा देणार का?

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान, या निमित्ताने राज ठाकरेंची भव्य सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीची राज्यात धामधूम पाहायला मिळत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. यामध्ये मनसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का? मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसे बाहेर राहून महायुतीला पाठिंबा देणार का? मनसे महायुतीमध्ये गेल्यास किती जागा मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तर राज ठाकरे या गुढीपाडवा मेळाव्यातील सभेतून देणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर लवकरच राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तोफ धडाडणार आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचे बडे नेते नेमकं काय म्हणताय, त्यांच्या काय आहेत भावना बघा व्हिडीओ…

Published on: Apr 09, 2024 07:45 PM
एकदा जर मी तोंड उघडलं ना… बारामतीत भावकीतच जुंपली, अजित दादांनी कुणाला अन् काय दिला इशारा?
निवडणुकीत डॉक्टर, नर्सेस मतदारांची नाडी मोजणार की डायपर बदलणार? आयोगावर राज ठाकरे बरसले