मनसे नेत्यानं काय मांडली शोकांतिका? अन् म्हणाले, ‘नेमकं काय चुकतंय आणि हे असं का होतंय?’
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मराठी चित्रपटांसंदर्भात समाज माध्यमांवर शोकांतिका मांडल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटांकडे मराठी प्रेक्षकांनीच पाठ फिरवली असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी यावरच ट्वीट करत भाष्य केले आहे.
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | दिवसेंदिवस मराठी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. यामुद्द्यावरूनच मनसे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटांकडे मराठी प्रेक्षकांनीच पाठ फिरवली असल्याची खंत मनसे नेते अमेय खोपकर यांनी व्यक्त केली आहे. तर अमेय खोपकर यांनी मराठी चित्रपटांसंदर्भात समाज माध्यमांवर शोकांतिका मांडली आहे. तर मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात या, असे आवाहनही अमेय खोपकर यांनी मराठी प्रेक्षकांना आवर्जून केले आहे तर त्यांनी यासंदर्भात समाज माध्यमांवर आपली भूमिकाही मांडली आहे. खोपकर म्हणाले, ‘आत्मपॅम्फ्लेट हा मराठी चित्रपट आज बघितला. अतिशय उत्तम सिनेमा आहे, जो भरपूर हसवणूक करतो आणि तितकाच विचार करायलाही लावतो. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर देशभरातील सर्व प्रेक्षकांनी पहायला हवा असा झालेला आहे.’,
पुढे खोपकर म्हणाले, दुर्दैवाने, आज जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा आम्ही फक्त पाचजण सिनेमाहॉलमध्ये होतो. मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? एका उत्कृष्ट कलाकृतीला प्रेक्षक मिळतील नसतील तर नेमकं काय चुकतंय आणि हे असं का होतंय, याचा आता निर्माते आणि प्रेक्षक, सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. भविष्यात यासाठी पुढाकार घेऊन जे जे करावं लागेल ते आम्ही करणारच..