INDIA आघाडीच्या बैठकीतील पंचपक्वान्नावरून मनसेचा ‘मविआ’वर निशाणा, Watch Video

| Updated on: Aug 31, 2023 | 4:53 PM

VIDEO | मनसेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांचा इंडियाच्या बैठकीवर निशाणा, बैठकीतील पंचपक्वान्नावरून अमेय खोपकर यांची सडकून टीका, काय केला संतप्त सवाल?

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | विरोधकांच्या इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यासाठी ग्रँड हयातमध्ये जंगी व्यवस्था केली आहे. या बैठकीवर आणि जेवणातील पदार्थांवर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. ही टीका करतानाच मनसेकडून महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. अमेय खोपकर ट्वीट करून असे म्हणाले की, ‘राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.A आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे.’

Published on: Aug 31, 2023 03:53 PM
‘अजित पवार गटाकडून छे छे छे… ‘तो’ तर चिल्लर नेता’, अनिल देशमुख यांची नेमकी टीका कुणावर ?
सुषमा अंधारे यांचा नवनीत राणा यांना टोला; म्हणाल्या, त्या बाईला धड….