अमित ठाकरे यांनी लुटला फुलबॉल खेळण्याचा आनंद, कुठं अन् कुणासोबत बघा…
VIDEO | अमित ठाकरे यांनी लहानग्यांसोबत फुटबॉल खेळण्याचा लुटला आनंद, बघा व्हिडीओ
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी बोरीवली येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांमध्ये मनसे नेते अमित ठाकरेही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अमित ठाकरे यांचे पहिले प्रेम हे फुटबॉल आहे. फुटबॉल हेच पहिलं प्रेम असल्याने अमित ठाकरे यांनी तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक मुलांसोबत थोडा वेळ का होईना फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. अमित ठाकरे यांच्यासोबत फुटबॉल खेळायला मिळाल्यामुळे तेथीस लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमित ठाकरे यांच्यासोबत त्या लहान मुलांनी धम्माल मजा मस्ती करत फुटबॉल हा गेम खेळला. अमित ठाकरे यांचे हाच व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Published on: Mar 13, 2023 04:26 PM