कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांकडून चोप, मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले, ‘माज केला तर…’

| Updated on: Oct 02, 2023 | 10:58 PM

VIDEO | कल्याणमध्ये एका मराठी भाषिक असलेल्या विद्यार्थ्याला मराठी असल्याच्या मुद्द्यावरुन परप्रांतीय फेरीवाल्याने शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले, यानंतर आक्रमक होत मनसैनिकांनी फेरीवाल्याला मारहाण केली. कल्याण येथे झालेल्या मारहाणीप्रकरणी अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया

कल्याण, २ ऑक्टोबर २०२३ | कल्याणमध्ये एका विद्यार्थ्याला मराठी असल्याच्या मुद्द्यावरुन परप्रांतीय फेरीवाल्याने शिवीगाळ केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. याघटनेनंतर मनसेकडून या परप्रांतीय फेरीवाल्याला मनसे स्टाईलनं धडा शिकवण्यात आला. वाशिंद येथे राहणारा एक विद्यार्थी कल्याणमध्ये काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्याकडून एक वस्तू विकत घेतली होती. ती वस्तू खराब असल्याने तो विद्यार्थी पुन्हा कल्याणमध्ये आला. विद्यार्थ्याने ती वस्तू बदलून देण्यासाठी फेरीवाल्याकडे विनंती केली. मात्र फेरीवाल्यांनी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला. फेरीवाल्याने “तुम मराठी लोक ऐसे ही होते हो”, असे बोलून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान केला. त्यानंतर कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांनी त्या फेरीवाल्याला जोरदार चोप दिला.

यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘कल्याण येथे झालेल्या मारहाणीमध्ये मनसैनिकांनी परप्रांतीयाला योग्य तो धडा शिकवलेला आहे. महाराष्ट्रात राहून आमच्या आई बहीण यांच्याबाबत जर कोण बेताल वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प राहणार नाही. तुम्ही जर माज कराल असाल तर तुम्हाला उत्तर देखील अशाच प्रकारे मिळेल’, असा इशारा त्यांनी दिला

Published on: Oct 02, 2023 10:58 PM
सहा महिन्यात मंत्री म्हणून फिरणार, ठाकरे गटाच्या नेत्याचे खळबळजनक विधान
‘वडिलांना मुलगी चप्पल घालते याचं मार्केटिंग झालंय’, शरद पवार अन् सुप्रिया सुळे यांच्यावर कुणाचा निशाणा?