MNS Avinash Jadhav : विधानसभेतील पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज ठाकरेंना पाठवलं पत्र अन्…

| Updated on: Dec 01, 2024 | 4:18 PM

मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत आपला राजीनामा दिला आहे. मनसे नेते अविनश जाधव यांच्याकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षाचा राजीनामा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटातून आणि ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यात मनसेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत आपला राजीनामा दिला आहे. मनसे नेते अविनश जाधव यांच्याकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षाचा राजीनामा देण्यात आला आहे. यासह पालघर जिल्हाध्यक्ष पदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र सुपूर्द करत अविनाश जाधव यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपला राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे दिला आहे. मात्र राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांचा हा राजीनामा अद्याप स्वीकारला नसून राज ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे नेत्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. अशातच मनसेचे मतांची टक्केवारीही घटल्यामुळे पक्षाची मान्यता राहणार का, याबाबत चर्चा सुरू आहे.

Published on: Dec 01, 2024 04:14 PM
Devendra 3.0 : येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
Eknath Shinde : सत्तास्थापनेच्या हालचाली दरम्यान दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर स्पष्टच बोलले; ‘गावी जायचं नाही का? असा कोणता नियम…’