त्याला आज 32 वर्ष झाले, पण आता बाळासाहेब ठाकरे नाहीतर राज ठाकरे… बाळा नादंगावकर काय म्हणाले?

| Updated on: Feb 06, 2024 | 1:27 PM

मनसे नेत बाळा नादंगावकर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीची एक वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज भेट म्हणून दिली आहे. म्हणाले, अयोध्येत कारसेवेला गेलो तेव्हा जिवंत येऊ की नाही हे माहित नव्हतं. तो प्रसंग आजही आठवला तरी...

मुंबई, ६ फेब्रुवारी, २०२४ : मनसे नेते बाळा नादंगावकर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीची एक वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज भेट म्हणून दिली आहे. ही भेट स्वीकारल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, 6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातल्या दोन वीटा बाळा नांदगावकर घेऊन आले. तर बाळा नांदगावर यांनी त्यावेळीचा प्रसंग सांगितला. अयोध्येत कारसेवेला गेलो तेव्हा जिवंत येऊ की नाही हे माहित नव्हतं. तो प्रसंग आजही आठवला तरी…तो प्रसंग बाका होता. त्यावेळी फक्त जय श्रीरामच्या घोषणा ऐकू यायच्या. पण मझी एक इच्छा होती. जेव्हा राम मंदिर होईल तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ती वीट द्यावी, पण आज 32 वर्षे झालेत आज बाळासाहेब ठाकरे नाहीत आमच्यादृष्टीने राज ठाकरेच आमचे बाळासाहेब आहेत.

Published on: Feb 06, 2024 01:27 PM
अयोध्येतील बाबरी मशिदीची वीट ‘शिवतीर्था’वर, राज ठाकरे यांना कुणी दिली भेट?
संजय राऊत यांना आता कोणी सीरिअस घेत नाही, सरकारमधील मंत्र्यानं उडवली खिल्ली