राज साहेबांनी फक्त मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य केलं नव्हतं

| Updated on: Apr 12, 2022 | 6:49 PM

यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज ठाकरेंवर अनेकांनी आरोप केले, मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरे अडचणीत सापडले. या सगळ्यावर आज सभा होत असताना मनसे नेते गजानन काळे यांनी वक्तव्य केलंय.

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackrey) यांची आज ठाण्यात (Thane) उत्तरसभा आहे. राज ठाकरेंनी यापूर्वी घेतलेल्या सभेत हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मशिदीवर भोंगे दिसले तर आम्ही देखील स्पीकरवर (Speaker) हनुमान चालीसा लावू असं ते म्हणाले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज ठाकरेंवर अनेकांनी आरोप केले, मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरे अडचणीत सापडले. आज सभा होत असताना या सगळ्यावर मनसे नेते गजानन काळे यांनी वक्तव्य केलंय.
“अनेकदा शब्दांचे विपर्यास केले जातात. राज साहेबांनी फक्त मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य केलं नव्हतं, शिक्षणापासून अनेक मुद्द्यांवर राज साहेब बोलले. पण आपल्या सोयीचं राजकारण करायचं आणि राज साहेबांनी धर्माला विरोध केला असं म्हणायचं… “

Published on: Apr 12, 2022 06:46 PM