प्रियंका चतुर्वेदी यांची मनसे नेत्यानं काढली लायकी, काय दिलं प्रत्युत्तर?
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो असल्याचे म्हणत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज ठाकरे यांच्या मनसेवर निशाणा साधला आहे. या टीकेवर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर हल्लबोल करत काय दिलं प्रत्युत्तर
सोलापूर, ८ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकीकडे राज्यातील टोल दरवाढीवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य झिरो असल्याची जहरी टीका उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. या टीकेवर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. प्रियंका चतुर्वेदीचं भविष्य काय? असा सवाल करत दिलीप धोत्रे म्हणाले, कोण प्रियंका चतुर्वेदी? खासदार होण्यापूर्वी किंवा झाल्यावर त्यांचे काम काय आहे. त्या कशा खासदार झाल्यात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलायला आम्हाला वेळ नाही. मनसेवर बोलायला प्रियंका चतुर्वेदी यांची लायकी नाही. तर समाजासाठी, महाराष्ट्रासाठी त्यांचे योगदान काय? असाही खोचक सवाल त्यांनी केला आहे.
Published on: Oct 08, 2023 05:36 PM