अजितदादांनी मुख्यमंत्री पदाचा कोट शिवायला…, मनसे नेत्याची खोचक टीका

| Updated on: Oct 17, 2023 | 10:46 PM

VIDEO | अजितदादा म्हणजे घोटाळा अन् भ्रष्टाचार, मनसे नेत्याची टीका काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. कायम अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाव येतं आणि...

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | कायम उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाव येतं. दादांनी मुख्यमंत्री पदाचा ‘ कोट ‘ शिवायला टाकला की मात्र अचानक कुठलं तरी विघ्न येतं. कधी ते विघ्न धरणाचं असतं तर कधी ते घोटाळ्यांचं असतं. अजितदादा म्हणजे घोटाळा, भ्रष्टाचार हे त्यांचे समानार्थी शब्द झालेत, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर अजित दादांचे प्रवक्ते घासलेट चोर त्यांच्याबाबत स्पष्टीकरण देऊन त्यांचे सुद्धा घासलेट संपले की काय? असे आता महाराष्ट्राला वाटू लागलंय, असे म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांना खोचक टोला लगावलाय.

Published on: Oct 17, 2023 10:46 PM
‘जवळच्या मित्रांनी फसवले’, एकनाथ खडसे कोर्टाची पायरी चढले; भर कोर्टात हात जोडला
गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर अजित पवार गटातील नेत्याचं प्रत्युत्तर, महायुतीत मिठाचा खडा…