रोहित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री? मनसे नेत्याकडून राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न
VIDEO | महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित पवार; आता फक्त हेच बॅनर लागणं बाकी, मनसेच्या या नेत्यानं साधला राष्ट्रवादीवर निशाणा, बघा व्हिडीओ
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपलाच नेता भावी मुख्यमंत्री व्हावा असे असल्याचे सध्या सुरू असलेल्या मुंबईतील बॅनरबाजीवरून दिसतेय. गेल्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आता खासदार सुप्रिया सुळे या तिनही राष्ट्रवादी नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्याचे पाहायला मिळाले आणि राजकीय वर्तुळात यावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका देखील सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता मनसे प्रवक्ते यांनी राष्ट्रवादीला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवल्यानंतर रसातळाला घेऊन गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते स्वतःचा पक्ष संपवणार का, अशी शंका घ्यायला जागा असल्याचा निशाणा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राष्ट्रवादीवर साधला आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्यानंतर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित पवार, आता फक्त हेच बॅनर लागणं बाकी असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.