उद्धव ठाकरे म्हणजे रुसवे बाबा; मनसे नेते गजानन काळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका

| Updated on: Jan 29, 2023 | 7:54 AM

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती म्हणजे किंचित अशी..काय म्हणाले गजानन काळे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. तर आता घे भरारी, चेंबूर विधानसभा मतदार संघासाठी जाहीर सभा घेताना त्यांनी महाविकास आघाडी, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

तर वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर टीका करताना ती किंचित अशी युती झाली होती, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार भाजपचे आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, मला वाटले राष्ट्रवादी आक्रमक होईल मात्र यावर संजय राऊत आक्रमक होताना आपल्याला दिसले अशी टीकाही त्यांनी यावेळी खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटावर केली आहे. महाविकास आघाडीतील पक्ष रोज या सरकारला घटनाबाह्य सरकार म्हणून त्यांच्यावर टीका करतात.

Published on: Jan 29, 2023 07:54 AM
दिवसाची सुरुवात महत्वाच्या 100 बातम्यांनी, पाहा महाफास्ट 100
जेव्हा मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं तेव्हाच मी ठरवलं की…; नवनीत राणांनी निर्धार बोलून दाखवला…