Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मुस्लिम धर्मातील ‘त्या’ महिलांना देऊ नका; आक्रमक मनसे नेत्याची मागणी
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यावा, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील, अशी घोषणा र्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान, सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यावा, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम धर्मात 2 पेक्षा जास्त मुले आणि एका पेक्षा जास्त बायका असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, असं स्पष्ट मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं. ‘सरकार यांच्या बायका सांभाळण्यासाठी नाही तर ज्यांना गरज आहे त्या महिलांचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावं, म्हणून सरकारने ही लाडकी बहीण योजना जाहीर केली. पण सरकारच्या योजनेचा असा कोणी फायदा घेणार असेल तर ते योग्य नाही. ‘, असंही प्रकाश महाजन म्हणाले. जर विवाहित महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना किती अपत्य आहे? हे पाहून त्या महिलांना या योजनेचा लाभ द्यावा, कोणावर अन्याय करा असं मी म्हणत नाही. जर एका पुरूषाला तीन बायका असतील तर त्या तिघींना सरकार या योजनेचा लाभ देणार का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला आहे.