‘संजय राऊत एक्सपायरी डेट औषध’, कुणी केली खोचक टीका
VIDEO | राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व न करता देश पातळीचे नेतृत्व करावं, कुणी दिला राज ठाकरे यांना सल्ला
ठाणे : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्यावर भाष्य करताना संजय राऊत यांच्यावरही खोचक टीका केली. राज ठाकरे हिंदूचे एकमेव नेते आहेत. भाषण झाल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. शासनाचे मी आभार मानतो. कमीत कमी कोणाचे तरी त्यांना धाक आहे .राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व न करता देश पातळीचे नेतृत्व करावं. राज ठाकरे यांच्याकडे देशाचे नेतृत्व द्यावे आताचे मुख्यमंत्री स्वतःला बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाऊ म्हणतात त्यांच्या मिरवणुकीत पारू आणि देवदास सिनेमा पाहिला हे त्यांचे हिंदुत्वाचे विचार ? हे तर इमरान हाशमीचे विचार आहेत. यांचा काय हिंदुत्वाशी संबंध , असा सवालही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. तर आम्ही पुन्हा भोंग्या संदर्भात तीव्र आंदोलन छेडणार आहे. कितीही नोटीस आम्हाला बजावा कारवाई करा, आम्हाला त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही, मात्र जे अजान भोंग्यामार्फत होते ते आम्ही का ऐकायचे? असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, संजय राऊत हे एक्सपायरी डेट औषध आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यायला लागतं का? तर तुम्ही कामंच तशी केली आहेत उद्यापासून सांगा उद्धव ठाकरे यांचे नाव घेणार नाही त्यांची इच्छा असेल तर संजय राऊत हे करमणूक आहेत जास्त विचार करायचा नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.