‘उबाठातील अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी’, मनसे नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Oct 13, 2024 | 5:14 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मुंबईतील गोरगाव येथे पार पडला. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरले तर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला.

Follow us on

महाविकास आघाडीत उबाठा हा पक्ष आहे. या उबाठामध्ये दोन मोठे नेते आहेत. एक सुषमा अंधारे आणि संजय राऊत. बाकी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे किरकोळ नेते आहेत. उबाठामध्ये सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे मोठे नेते असून त्यातील एक वाघ्या आणि दुसरी मुरळी, असे वक्तव्य करत प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे आणि संजय राऊतांवर शाब्दिक हल्ला चढवला. सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना बुक्का लावतील आणि घरी बसवतील, असं म्हणत टिकास्त्रही डागलं. दरम्यान, मनसेचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मुंबईतील गोरगाव येथे पार पडला. यावेळी प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे आणि संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ‘उद्याचा नटसम्राट सिनेमा करायचा ठरवलं तर उद्धव ठाकरेंना करा. ते उद्या घर देता का घर हा संवाद म्हणतील, कुणी मुख्यमंत्रीपद देतं का मुख्यमंत्रीपद.. हा कोमट पाणी प्यायलेला, थकलेला कुणी घर देता का घर’, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला इतकंच नाहीतर मुख्यमंत्रीपदासाठी एवढे हपापलेपणा, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका केली.