‘उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठिशी उभं राहून त्यांना संधी द्यावी’, ‘मनसे’ नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 08, 2023 | 4:06 PM

VIDEO | 'सध्या सुरू असलेली राजकीय परिस्थिती बघता सक्षम विरोधीपक्ष नेते म्हणून राज ठाकरे योग्य', 'मनसे' नेत्याचं मोठं वक्तव्यानं चर्चांना उधाण

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यावर आता मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात जो असंतोष निर्माण झालेला आहे, त्या असंतोषाला राज ठाकरे हे वाचा फोडू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका घेऊन राज ठाकरे यांच्या पाठीशी थांबणं गरजेचं आहे आणि राज ठाकरे यांना राज्यात नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली आहे. तर राज्यात राज ठाकरे यांनी नेतृत्व केलं तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, स्वाभिमान, हिंदुत्व आणि मराठीपण महाराष्ट्रात टिकून राहिल, असा विश्वासही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केला. तर गेल्या काही दिवसांत राज्यात जी काही राजकी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनता अस्वस्थ आहे. जनतेला हे काहीच आवडलेले नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता केवळ राज ठाकरे यांच्यात आहे. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना नेतृत्व देऊन आशीर्वाद दिले पाहिजे, असेही पुढे ते म्हणाले.

Published on: Aug 08, 2023 04:06 PM
पुणे दहशतवादी प्रकरण आता NIA कडे, दहशतवाद्यांचे ISIS शी लागेबांधे असल्याचे उघड
My India My LiFE Goals | सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरण वाचवा