Raj Thackeray यांचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘…ती खुमखुमी आता मिटली असेल’
VIDEO | जालन्यातील मराठा आंदोलकांवरील झालेल्या लाठीचार्जवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? '
मुंबई, २ सप्टेंबर २०२३ | जालन्यात शुक्रवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचे सांगितले जात आहे. या लाठीचार्जच्या घटनेत अनेक जण जखमी झाली. या घटनेचे राज्यभरातून पडसाद उमटताना दिसत आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यात घडलेल्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट करत राज्यसरकारला धारेवर धरले आहे. जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? असा सवाल करत ते म्हणाले, काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल, असे म्हणत निशाणा साधला