राज ठाकरे यांचं 2 हजारांच्या नोटबंदीवर भाष्य; म्हणाले, ‘असले निर्णय…’
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 2 हजारांच्या नोटाबंदीवरून मोदी सरकारवर सडकून टीका, काय म्हणाले?
नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार, 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा किंवा बदलून घ्यावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय काल जाहीर केला आणि देशभरातून प्रतिक्रिया समोर आल्यात. 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो विचारपूर्वक आणि काही विचाराअंतीच घेतला असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नोटाबंदी झाली त्याचवेळी मी बोललो होतो. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारून नोटाबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती. तेव्हा नोटा आल्या त्या एटीएममध्ये जात नव्हत्या. नोट एटीएममध्ये जाईल की नाही याचा विचारही तेव्हा केला नव्हता. असले निर्णय परवडणारे नसतात. उद्या बँकेत पैसे टाकायचे. नंतर नवीन नोट आणणार. असं काही सरकार चालतं का? असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.