‘उंची छलांग लगाने के लिये चिता..’, राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर राजू पाटलांची पोस्ट चर्चेत

| Updated on: Apr 11, 2024 | 12:19 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी wall वर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्याइतकं) सोप्पं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो, राजू पाटलांची पोस्ट

मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेते राजू पाटलांची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. ‘उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है..’, असं या फेसबुक पोस्टमध्ये राजू पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मनसैनिक, कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम असताना राजू पाटलांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी wall वर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्याइतकं) सोप्पं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो.’, असं त्यांनी म्हटलंय. तर आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाहीय. आमच्या आगरी भाषेत म्हण आहे ‘खायाची मोत, पुन मिशीला तेल’ अशी मोदींच्या विरोधकांची अवस्था. ह्यांच्या नेतृत्वात आपल्या देशाचं काय भलं होणार? शिवाय मोदींच्या कणखर निर्णयांनी देशाची प्रतिमा उजळली आहे. खिळखिळी अर्थव्यवस्था ते पहिल्या पाचात जाऊ शकणारी अर्थव्यवस्था, ३७० कलम रद्द करणे आणि माझ्या वैयक्तिक इच्छेतलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे राम मंदिराचे निर्माण, देशातील डिजिटल क्रांती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत, असे म्हणत आम्हा सर्व मनसैनिकांच्या आवडत्या शैलीत बोट उंचावून साहेबांनी सांगितलंच आहे…..विधानसभेच्या तयारीला लागा.

Published on: Apr 11, 2024 12:19 PM
पुण्यात दोन्ही दादांनी मारला मिसळीवर ताव, आस्वाद घेत काय रंगल्या गप्पा?
अशोक चव्हाणांचे राईट हँड विजय वडेट्टीवार लवकरच भाजपात, चर्चेचा साक्षीदार; कुणाचा खळबळजनक दावा?