संदीप देशपांडे वरळीतून निवडणूक लढवणार? काय केलं सूचक वक्तव्य
VIDEO | तर मी गडचिरोली येथूनही निवडणूक लढवेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वरळी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर नेमके काय म्हटले?
मुंबई : मनसे राज ठाकरे यांनी जर आदेश दिला तर गडचिरोलीतून देखील निवडणूक लढवेल, असा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले असून त्यांनी वरळीतून निवडणूक लढण्याच्या चर्चेवर सूचक वक्तव्य केले आहे. संदीप देशपांडे यांच्या अलीकडे वरळीच्या फेऱ्या वाढू लागल्यात इतकेच नाही तर नुकतीच त्यांनी बीडीडी चाळीच्या रहिवाशांची समस्या जाणून घेण्यासाठी भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणूक वरळीतून लढवणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर संदीप देशपांडे यांनी भाष्य करताना म्हटले की, वरळी मतदारसंघ हा दादर मतदारसंघाच्या अगदी लागून असलेला मतदारसंघ आहे. बीडीडी चाळीच्या रहिवाशांनी आपल्या समस्या घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांची बैठक घेण्यास सांगितली. दरम्यान, वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहात का? यावर संदीप देशपांडे म्हणाले, राज ठाकरे मला जो आदेश देतील त्याप्रमाणे निवडणूक लढवेल.