मनसे महायुतीत येणार? शिंदे अन् फडणवीस यांच्याशी घेतलेल्या भेटीवर संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले….
मनसे नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास चर्चा झाली. याभेटीवर आणि मनसे महायुतीत सहभागी होणार का? यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष येणार का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे. तर काल मनसेच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगला तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल होत त्यांची भेट घेतली. मनसे नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास चर्चा झाली. याभेटीवर आणि मनसे महायुतीत सहभागी होणार का? यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि मी भेटलो ही साधारण भेट होती. त्यामध्ये वेगळं काही नव्हतं’, असं स्पष्टपणे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.