जलील यांच्या वक्तव्यावरून मनसेचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आधी राष्ट्रवादी, काँग्रेस, आझमींचा समाजवादी पक्ष आणि आता एमआयएम एका मुलाची मज्जाच मज्जा आहे बुवा असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला एमआयएमला देखील सोबत घेण्याची ऑफर दिली आहे. मात्र एमआयएमला सोबत घ्यायचे की नाही? यावरून महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आधी राष्ट्रवादी, काँग्रेस, आझमींचा समाजवादी पक्ष आणि आता एमआयएम एका मुलाची मज्जाच मज्जा आहे बुवा असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
Published on: Mar 20, 2022 11:14 AM