हाताला फ्रॅक्चर, डिस्चार्जनंतर व्हिलचेअरवरून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 03, 2023 | 11:22 AM

VIDEO | संदीप देशपांडेंवर उपचार झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, काय म्हणाले बघा...

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. मात्र, हल्लेखोर कोण आहेत? त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे संदीप देशपांडे यांनी सांगितलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे

Published on: Mar 03, 2023 11:22 AM
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर अजित पवार यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले,’… असंच होणार’
संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग नोटीशीवरून मोठी बातमी, आज संध्याकाळी उत्तर द्यावं लागणार अन्यथा…