VIDEO : मनसे नेते Sandeep Deshpande पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: May 04, 2022 | 12:09 PM

राज ठाकरे यांनी 04 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवरच मनसेने हा इशारा दिला असून तो न पाळल्यास तीव्र प्रतिक्रिया देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

राज ठाकरे यांनी 04 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवरच मनसेने हा इशारा दिला असून तो न पाळल्यास तीव्र प्रतिक्रिया देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची ऐतिहासिक सभा पार पडल्यानंतर औरंगाबादसारख्या संवेदनशील शहरात त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर येत्या 04 मे पर्यंत मशिदींवरचे लाऊडस्पीकर काढण्यासाठीचा अखेरचा अल्टिमेटमही देण्यात आला होता. याच सभेत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लाऊड स्पीकर हटवले नाहीत तर थेट ते हटवण्यासाठी पुढाकार घ्या, असे आदेश दिले होते. त्यामुळे औरंगाबादमध्येच या आदेशाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

VIDEO : Sanjay Raut | भोंग्यांवरुन आंदोलन करांव अशी राज्यात परिस्थिती नाही
VIDEO : Rizwan merchant | अटी शर्तीसह राणा दाम्पत्याला जामीन मंजुर, rizwan merchant यांच वक्तव्य