आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होतेय- संदिप देशपांडे
बेस्टने ज्यांच्यासोबत करार केलाय, त्या कंपन्या कर्मचाऱ्यांना पैसा देत नाहीत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. अशा स्थितीसाठी जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे.
बेस्टने ज्यांच्यासोबत करार केलाय, त्या कंपन्या कर्मचाऱ्यांना पैसा देत नाहीत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. अशा स्थितीसाठी जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे. “आदित्य ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे. मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होतेय. गुजराती कंपन्यांना मातोश्रीतून यांनी कंत्राटं दिलेत. मराठीचा पुळका आणता, मग मराठी कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाहीत,” असं ते म्हणाले. कामगार आणि मनसेच्या वतीने त्यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार केला आहे. मात्र आता 5 सप्टेंबरपर्यंत आम्ही अल्टीमेटम देत आहोत. 6 सप्टेंबरला आम्ही लोकेश चंद्रा यांना त्यांच्या केबिनमध्ये बसू देणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.
Published on: Aug 27, 2022 04:07 PM