बिन’शर्ट’ पाठिंबा, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचाही पलटवार

| Updated on: Jun 21, 2024 | 10:45 AM

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.... काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना...

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची तोफ भाजपवर धडाडली तसा मोर्चा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे वळवत त्यांच्यावर बोचरी टीका केली. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरूनच बिन’शर्ट’ पाठिंबा म्हणत उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची खिल्ली उडवली गेली आहे. ‘देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे’, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत शिवतीर्थावरील गुढीपाडव्या मेळाव्यातून केलं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना, बरोबर की चूक आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला. बघा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Published on: Jun 21, 2024 10:40 AM
OBC Reservation : ‘आमचा पोरगा उपाशी, सरकारनं आमच्या मुलाच्या…’, लक्ष्मण हाकेंच्या आई-वडिलांना अश्रू अनावर
‘लंगोट’वरून खेचाखेची, शिंदे गट-अजित पवार गटात शाब्दिक चकमक, एकमेकांची काढली ‘लंगोट’