राज ठाकरे यांनी ‘त्या’ राड्याची शक्यता आधीच वर्तवली होती? मनसेकडून व्हिडीओ शेअर

| Updated on: Mar 31, 2023 | 2:57 PM

VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण, बघा कोणता व्हिडीओ केला शेअर

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून राज ठाकरे यांच्या एका भाषणाचा जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या राड्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात देखील उमटले. मुंबईतील मालवणी परिसरात देखील रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच मनसेकडून राज ठाकरे यांच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांनी भविष्यात होणाऱ्या राड्याची शक्यता वर्तवली होती. या ट्विटमधील राज ठाकरेंच्या भाषणात ते म्हणताय, आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर एकदा धाडी टाका काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल पाकिस्तान सारख्या शत्रूची आपल्याला गरजच नाही. उद्या जर काही घडलं तर आत मधली परिस्थिती आवरता आवरता आपल्या नाकी नऊ शकते. इतक्या गोष्टी आज भरल्या आहेत परंतु आपलं लक्ष नाही दरम्यान संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत ऐका आणि स्वस्थ बसा असं कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Mar 31, 2023 02:52 PM
म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांच एका वाक्यात उत्तर; म्हणाले, असल्या आलतू फालतू…
रामनवमीच्या मिरवणुकीत गिरीश महाजन बेधुंद नाचले; बघा तुफान डान्सचा व्हिडिओ