‘एक दिवसाची नर्स इंजेक्शन तरी देता येतं का?’, नाव न देता मनसे नेत्यानं कुणाला घेरलं

| Updated on: Mar 09, 2023 | 10:43 PM

VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भांडूप येथील मनसेच्या शाखेला भेट दिली, तेव्हा कुणावर साधला निशाणा

ठाणे : ठाण्यातील भांडूपच्या मनसे शाखा क्रमांक ११४ येथे आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भांडूपच्या मनसे शाखेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना भेट दिली आणि टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, भांडूपच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती भांडूप शाखेला भेट द्यावी म्हणून मी आज येथे आलो. भांडुपकरांना मला भेटायचे होते. रोज शिवाजी पार्कमध्ये येऊन भेटायचा प्रयत्न करायचे म्हणून मी आज स्वतः यांना भेटायला आलो आहे. आज साहिबांची सभा सुद्धा आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला देखील संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले बघा व्हिडीओ…

Published on: Mar 09, 2023 10:42 PM
‘गाजर हलवा खाणाऱ्यांना हलवाच लक्षात येतो’,  ठाकरे यांच्या टीकेवर कुणी दिलं खोचक प्रत्युत्तर
… म्हणून मुख्यंमत्रीपद गेलं, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय सुनावलं