‘याद राखा नाहीतर… तुमच्या कानाखाली DJ वाजणार’, सुषमा अंधारे यांना कुणाचा थेट इशारा?

| Updated on: Oct 06, 2023 | 6:13 PM

VIDEO | गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीजे, डॉल्बीच्या आवाजावर भाष्य केले होते. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचलं होतं. त्यानंतर मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देत घेतला खरपूस समाचार

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीजे, डॉल्बीच्या आवाजावर भाष्य केले होते. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना डिवचलं होतं. यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. ‘कोणताही संबंध नसताना सुषमा अंधारे यांनी राज साहेबांच्या नातवावर बोलतात मुळात कुटुंबातील सदस्याचा संबंध नसताना राजकारणात आणून बोलणे ही त्यांची सवयच आहे. काल राज साहेबांच्या नातवावर बोलल्या त्याअगोदर त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री यांच्या नातवावर बोलले होते. कुटुंबातील सदस्यावर बोलणे यांची जुनीच सवय आहे.’, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर सुषमाबाई तुमच्या मुलीवर आम्ही काय बोललो तर सहन कराल का? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी करत आताच सांगतोय पुन्हा राज ठाकरे यांच्या नातवावर बोललात तर तुमच्या कानाजवळ येऊन डीजे वाजवू, इतका वाजवू की अंधारे यांना खरंच अंधार दिसेल, असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे. तर याटीकेवर प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘बिन महत्त्वाच्या लोकांवर मी बोलत नाही. आणि डीजे वाजवण्याची प्रचंड इच्छा असेल तर आरोग्यकर्मचारी आणि सरकारच्या कानाखाली वाजवणार का?’, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे.

Published on: Oct 06, 2023 06:13 PM
पवार घरातील वादाला कंटाळून लोकांनी राष्ट्रवादी सोडली, कुणी केली खोचक टीका?
Nitesh Rane यांनी नाव न घेता विरोधकांना दिला इशारा, म्हणाले, ‘करारा जवाब मिलेगा..’